इराणचा नवाझ अली ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता
दिनांक २२/०९/२०२० आणि २३/०९/२०२० रोजी मानांकित खेळाडू आणि बुद्धिबळ प्रशिक्षक श्री. श्रेयस विवेक पुरोहित यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वगंगा चेस अकॅडमी, सातारा आणि चेसनट अकॅडमी, सोलापूर यांच्या मार्फत ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
दिनांक २२/०९/२०२० रोजी आयोजित केल्या गेलेल्या खुला गट ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेमध्ये इराणचा नवाझ अली हा विजेता ठरला. त्याने ८१ गुणांसह विजेतेपद पटकावले. पश्चिम बंगालचा अनुस्तुप बिस्वास हा ६६ गुणांसह उपविजेता ठरला. तमिळनाडूचा मानांकित खेळाडू जी गौतम यास ६५ गुणांसह तृतीय स्थान प्राप्त झाले. तमिळनाडूचाच मानांकित खेळाडू अरुल आनंद यास ६१ गुणांसह चौथे स्थान प्राप्त झाले. कर्नाटकच्या प्रथमेश देशमुख यास ६० गुणांसह पाचवे स्थान प्राप्त झाले.
दिनांक २३/०९/२०२० रोजी आयोजित केल्या गेलेल्या रेटिंग बिलोव्ह २००० ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेमध्ये आंध्रप्रदेशचा संकर रेड्डी हा विजेता ठरला. त्याने ५८ गुणांसह विजेतेपद पटकावले. तेलंगणाचा चिद्विलास साई हा ५३ गुणांसह उपविजेता ठरला. केरळचा मानांकित खेळाडू अबदाल्लाह निस्थर यास ५१ गुणांसह तृतीय स्थान प्राप्त झाले. महाराष्ट्राच्या आर्य राठोड यास ४६ गुणांसह चौथे स्थान प्राप्त झाले. आसामच्या मरिनमोय राखोवा यास ४३ गुणांसह पाचवे स्थान प्राप्त झाले.
या स्पर्धेचे आयोजन सातारमधील नामांकित खेळाडू व बुद्धिबळ पंच श्री. शार्दूल तपासे आणि सोलापूरमधील नामांकित खेळाडू व बुद्धिबळ प्रशिक्षक श्री. चंद्रशेखर कोरवी यांच्या मार्फत करण्यात आले. तांत्रिक पंच म्हणून श्री. शार्दूल तपासे , श्री. दीपक वायचळ आणि श्री. सारंग विवेक पुरोहित यांनी काम पाहिले.
Comments
Post a Comment
Thank you for your valuable views